Breaking News

नियमांचे उल्लंघन करणार्या दुकानांवर कारवाई

नवी मुंबई : प्रतिनिधी

कोरोनाचा प्रदुर्भाव वाढत असल्याने शासनाने कडक निर्बंध लागू केले असुनदेखील काही दुकानदार ही बाब गंभीरपणे घेत नसल्याने पालिकेच्या जी विभाग कार्यालयातील दक्षता पथकातील कर्मचार्‍यांनी दुकान मालकास सूचना देऊनही नियमांचे उल्लंघन करून अकरा नंतर दुकान सुरू ठेवले होते. यामुळे या दुकानमालकावर कारवाई करण्यात येऊन त्याच्याकडून 50 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

शासनाने निर्देश दिल्याप्रमाणे गत चार दिवसांपासून किराणा, भाजीपाला, व फळे, दूध, दही, व अन्य जीवनावश्यक दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत, परंतु ऐरोली येथील एक दुकान सुचना नियमांचे उल्लंघन करून दुकान सुरू होते, मात्र याची माहिती दक्षता पथकाला मिळताच पथकातील अधिकारी, कर्मचारी नाईक, राहुल ओव्हाळ, पोलीस अमलदार काशीद व अन्य कर्मचार्‍यांनी धाव घेवून दुकानावर कारवाई करून दुकानचालकाकडून 50 हजार रुपये दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली.

निर्बंध कडक केले असूनही 11 नंतर खुली असणारी काही खाद्यपदार्थ विक्रेते व हॉटेल, बार व्यावसायीकांना समज देऊन व्यवसाय बंद करण्यास भाग पाडले. अन्यथा त्याच्यावर कारवाईचा बडगा उचलला जाईल व पालिकेकडून कारवाई करण्याचा इशारा  देण्यात आला असल्याचे पालिका सूत्रांनी सांगितले.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply