पनवेल ः पनवेल शहरातील वडाळे तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू आहे, परंतु कोरोनाच्या संकटामुळे या कामास उशीर झाला होता. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 6) भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी या कामाची पाहणी करून अधिकार्यांना आवश्यक त्या सूचना केल्या. उपमहापौर जगदिश गायकवाड, सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी यांच्यासह अधिकारी या वेळी उपस्थित होते. सभागृह नेते परेश ठाकूर यांनी हे काम लवकरात लवकर पूर्ण करून पनवेल शहराच्या सौंदर्यात या तलावामुळे भर पडणार असल्याचे स्पष्टकेले.
Check Also
नवी मुंबई विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्या; भाजपचे लक्षवेधी आंदोलन
पनवेल : रामप्रहर वृत्तनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते स्व. दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper