पनवेल ः रायगड जिल्ह्यात शनिवारी (दि. 21) नवे 85 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, तर 80 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 59 व ग्रामीण सात) तालुक्यातील 66, अलिबाग पाच, कर्जत व पेण प्रत्येकी चार आणि खालापूर, माणगाव, रोहा, सुधागड, श्रीवर्धन व महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. सुदैवाने दिवसभरात एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 56,071 आणि मृतांची संख्या 1593 झाली आहे. आतापर्यंत 53,596 जण कोरोनामुक्त झाल्याने 882 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
हॉटेल सी रॉकचे चित्रपटसृष्टीशी नातेसंबंध…
चित्रपटाच्या जगात एवढे, असे आणि इतके रंग एकमेकांत मिसळले गेले आहेत की त्याचा शोध अजिबात …
RamPrahar – The Panvel Daily Paper