हैदराबाद : वृत्तसंस्था हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक रणधुमाळीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी (दि. 29) रोड शो केला. त्यापूर्वी त्यांनी भाग्यलक्ष्मी मंदिरात पूजाही केली. रोड शोनंतर आयोजित पत्रकार परिषदेत शाह यांनी भाजप बहुमत मिळवेल आणि पुढील महापौर भाजपचाच असेल, असा विश्वास व्यक्त केला. आम्ही हैदराबादला नवाब, निजाम संस्कृतीतून मुक्त करणार आहोत. आम्हाला हैदराबादला एक आधुनिक शहर बनवायचे आहे असे सांगून शाह यांनी समर्थनबद्दल नागरिकांचे आभार मानले.
Check Also
अनुसूचित जमातीच्या विशेष पदभरतीचा प्रश्न विधिमंडळात!
प्रलंबित भरती तातडीने पूर्ण करण्याची आमदार प्रशांत ठाकूर व आमदार महेश बालदी यांची मागणी मुंबई …
RamPrahar – The Panvel Daily Paper