लंडन ः वृत्तसंस्था
युरो कप 2020 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात निर्णायक पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडचा पराभव झाला. यात इंग्लंडच्या मार्कस रॅशफोर्ड, जॅडॉन सँचो आणि बुकायो साका यांनी पाचपैकी तीन पेनल्टीवर पाणी सोडले. यानंतर इंग्लंडच्या चाहत्यांनी तिन्ही खेळाडूंवर वर्णभेदी टीका सुरू केली. यावर इंग्लंड आणि प्रसिद्ध फुटबॉल क्लब मँचेस्टर युनायटेडचा खेळाडू असलेल्या मार्कस रॅशफोर्डने प्रतिक्रिया दिली आहे. पेनल्टी चुकवली म्हणून मी माफी मागेन, पण मी जो आहे त्यासाठी माफी मागणार नाही, असे रॅशफोर्डने सांगितले.
23 वर्षीय रॅशफोर्ड म्हणाला, मला कुठून सुरुवात करावी माहीत नाही आणि मला या क्षणी कसे वाटते हे सांगण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. मी माझ्या वाईट कामगिरीसाठी पूर्ण दिवस टीका सहन करू शकतो. माझी पेनल्टी चुकली, पण मी जो आहे आणि जिथून मी आलोय त्यासाठी मी कधीच माफी मागणार नाही. माझ्यासाठी हा एक कठीण हंगाम होता. आत्मविश्वासाच्या कमतरतेसह मी अंतिम सामन्यात प्रवेश केला. मी माझ्या सहकार्यांची आणि सर्वांची मान खाली झुकवली. मी माझ्या झोपेतही यशस्वी पेनल्टी मारू शकतो, पण ही का नाही?
पेनल्टी घेतल्यापासून माझ्या डोक्यात हेच सुरू आहे. मला कसे वाटते याचे मी वर्णन करू शकत नाही. फायनल, 55 वर्षे, एक पेनल्टी आणि इतिहास. मी सर्वांची माफी मागेन आणि मागत राहीन. यंदाचे शिबिर चांगले होते. जे नाते इथे तयार झाले ते अतूट होते. तुमचा विजय हा माझा विजय आहे तसेच तुमचे अपयश हेच माझे अपयश आहे, असेही रॅशफोर्डने म्हटले आहे.
Check Also
अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा
आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …