Breaking News

फडके नाट्यगृहाच्या भाड्यात 50% सूट

पनवेल भाजप सांस्कृतिक सेलच्या पाठपुराव्याला यश

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महापालिकेच्या शहरातील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाच्या भाड्यात सुट तसेच अन्य सुविधांसंदर्भात भाजप सांस्कृतिक सेलचे पनवेल शहर मंडल अध्यक्ष अभिषेक पटवर्धन यांनी पालिका आयुक्तांसह महापौर डॉ. कविता चौतमोल, सभागृह नेते परेश ठाकूर यांना निवेदन दिले होते. या निवेदनाची दखल घेत 18 तारखेला झालेल्या पनवेल महापालिकेच्या महासभेत नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये सुट जाहीर करण्यात आली.

पटवर्धन यांनी निवेदनात नाट्यगृह नव्याने सुरू होताना आसन क्षमतेपेक्षा 50 टक्के जागा उपलब्ध असणार आहे. परिस्थिती पूर्वपदावर येण्याच्या दृष्टीने ठाणे व नवी मुंबई महापालिकेने टिकिट दर 400 रुपयांपर्यंत असणार्या नाटकांना भाड्यात 75 टक्के सूट देऊन नाट्यसृष्टीस पुन्हा उभे करण्यासाठी मदत केली आहे. या पार्श्वभूमीवर विचार करावा व मनोरंजनाच्या सर्वच प्रकारच्या कार्यक्रमांना किमान 50 टक्के सवलत द्यावी. यासह इतर मागण्या केल्या होत्या. या मागण्यांचा विचार करुन नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये सुट जाहीर करण्यात आली.

नाट्यगृहाच्या भाड्यामध्ये 50 टक्के सवलत मिळावी या मागणी संदर्भात पुढाकार घेणारे पनवेल पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल यांच्यासह सर्व सहकार्‍यांना मी मनापासून धन्यवाद देतो. 

-अभिषेक पटवर्धन, पनवेल शहर मंडल अध्यक्ष, भाजप सांस्कृतिक सेल

Check Also

पोषण आहारात मृत उंदीर सापडल्याच्या घटनेतील तपासणीचे नमुने नाकारणार्‍या प्रयोगशाळांवर कारवाई करणार

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रश्नावर ना.आदिती तटकरेंचे उत्तर पनवेल : रामप्रहर वृत्ततपासणीसाठी पाठवलेले नमुने नाकारणार्‍या …

Leave a Reply