Breaking News

पळस्पे हद्दीच्या महामार्गावरील अपघातांमध्ये मृत्यूचे प्रमाण घटले

पनवेल : वार्ताहर

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर होणार्‍या अपघातांचे मुख्य कारण हे वेग मर्यादेचे उल्लंघन असल्याचे निष्पन्न झाल्याने विहीत मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणार्‍या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. यासाठी पळस्पे पोलीस मदत केंद्राकडील अधिकारी अंमलदार यांनी कंबर कसली आहे. त्यामुळे द्रुतगती महामार्गावर अपघातामध्ये मृत्यूचे प्रमाण 40 टक्क्यांनी कमी झाले आहे.

राज्यातील महामार्गावर अपघाताचे प्रमाण कमी व्हावे याकरीता महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे यांचे वतीने अधिक वेगाने वाहन चालविणार्‍या बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करण्यात येत आहे. याकरीता पळस्पे पोलीस मदत केंद्राकडील अधिकारी अंमलदार यांनी कंबर कसली असून अप्पर पोलीस महासंचालक डॉ. भुषणकुमार उपाध्याय यांचे आदेशाप्रमाणे चालकांचे प्रबोधन व बेशिस्त चालकांवर कारवाई अशी विशेष मोहिम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत सन 2020 मध्ये इंटरसेप्टर वाहनादूवारे व मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर वेगवेगळया ठिकाणी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामार्फत अतिवेगाने वाहन चालविणार्‍या 41738 वाहनांवर कारवाई करण्यात आली. यात सीट बेल्ट न लावणे, मोबाइल संभाषण, लेन कटींग, काळ्या काचा, रिफलेक्टर नसलेल्या वाहनांवर तसेच इतर मो.वा.का.कलमाअंतर्गत 64286 वाहनांवर कारवाई करण्यात आली. अशाप्रकारे सन 2020 मध्ये महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे मार्फत एकुण 106024 वाहन चालकांवर चलनादवारे कारवाई करण्यात आलेली आहे.

पोलिसांकडून वेळोवेळी जनजागृती

महामार्ग पोलीस केंद्र पळस्पेकडुन अपघात कमी व्हावे तसेच वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमनाबाबत जनजागृती व्हावी याकरीता वेळोवेळी चौक सभा आयोजित करून वाहन पार्किंग स्थळे, कळंबोली ट्रक टर्मीनल, लॉजीस्टीक्स, खालापुर टोलनाका येथे कार्यकम घेऊन वाहतूक नियमांबाबतच्या माहितीबाबतची एका वर्षात 75000 पत्रके वाटण्यात आली. वाहतुक नियंमांचे उल्लंघन केल्यामुळे होणार्‍या अपघाताबाबत माहिती देवून अपघातसमयी मदत करण्याबाबत सुचना करण्यात येतात.

वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यास करण्यात येणार्‍या दंडात्म्क कारवाईबाबतची माहिती देवून वाहनचालकांचे प्रबोधन करण्यात येत असते.

-सुभाष पुजारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक, महामार्ग पोलीस केंद्र पळस्पे

Check Also

‘नैना’साठी शेतकर्‍यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका

आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तिसर्‍या मुंबईच्या अनुषंगाने नैना …

Leave a Reply