Breaking News

पेणमधील पीडितेच्या कुटुंबीयांना तातडीची मदत

समाजकल्याण विभागातर्फे चार लाख 12 हजार 500 रुपयांचा धनादेश सुपूर्द

पेण : प्रतिनिधी
शहरातील मळेघर आदिवासीवाडीतील तीन वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निघृणपणे हत्या करण्यात आली होती. तिच्या कुटुंबीयांना राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागातर्फे तातडीची मदत म्हणून चार लाख 12 हजार 500 रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कायदा सुधारित स्वरूप 2016 अंतर्गत पीडित कुटुंबाला सहाय्य म्हणून शासनाने मदतीचा 50 टक्के निधी अर्थसाह्य म्हणून तत्काळ दिला आहे. उर्वरित 50 टक्के निधी पोलिसांनी आरोपी विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर देण्यात येईल, अशी माहिती समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील जाधव यांनी दिली. या वेळी सदर पीडित कुटुंबीयांना एक महिन्याचे अन्नधान्य, जातीचा दाखला व पिवळे रेशनकार्डही देण्यात आले. या वेळी प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, तहसीलदार अरुणा जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विभा चव्हाण, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव आदी अधिकारी उपस्थित होते.

Check Also

झालमुरी, एसडी, आरडी आणि सुरांची अवीट मैफल!

‌‘पुरवैय्या‌’ने पनवेलकरांना दिली अविस्मरणीय सांगीतिक पर्वणी पनवेल : रामप्रहर वृत्तपश्चिम बंगालने हिंदी चित्रपटसृष्टीला अनिल विश्वास, …

Leave a Reply