नवी दिल्ली : भारतीयांसाठी एक आनंदाची बातमी आहे. देशात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला प्रारंभ होणार आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्यापही टळलेला नाही. काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने सीरम इस्टिट्यूट आणि भारत बायोटेकच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसींच्या आपतकालीन वापरासाठी परवानगी दिली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली देशातील कोरोनाची स्थिती आणि लसीकरणासंबंधी तयारीची माहिती घेण्यासाठी एका उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासोबतच केंद्र सरकारने देशभरात लसीकरणाच्या तारखेचीही घोषणा केली. देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.
Check Also
कळंबोलीत रंगणार कुस्त्यांचा आखाडा
विजेत्याला मिळणार पाच लाख रुपये व मानाची गदा पनवेल : प्रतिनिधीउदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी भारतीय …