Breaking News

‘पहिल्या तीन कोटी लोकांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार’

नवी दिल्ली ः देशामध्ये कोरोना लसीकरण मोहिमेला येत्या 16 जानेवारीपासून प्रारंभ होणार असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे. देशातील कोरोना साथीची स्थिती, मोहिमेची पूर्वतयारी अशा सर्व गोष्टींचा आढावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीत घेतला. कोविशिल्ड, कोवॅक्सिन या लशींच्या आपत्कालीन वापराला औषध महानियंत्रकांनी मंजुरी दिल्यानंतर काही दिवसांतच मोहीम सुरू करण्याचा विचार केंद्राने प्रत्यक्षात आणला आहे. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी (दि. 11) सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी पहिल्या तीन कोटी लोकांसाठी राबविल्या जाणार्‍या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार करणार असल्याची माहिती दिली. लसीकरणावर वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसारच काम करीत राहणार आहोत, असेही ते म्हणाले.

Check Also

पनवेल महापालिकेच्या नूतन महापौर निवासस्थानाचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर येथील सेक्टर २१मध्ये उभारण्यात आलेल्या ‘शिवनेरी’ या भव्य …

Leave a Reply