Breaking News

गाड्या रजिस्ट्रेशन करून देतो सांगून फसवणूक करणार्या चौघांवर कारवाई

पनवेल : वार्ताहर

बीएस-4 इंजिन मेकच्या नवीन गाड्या हरियाणा येथून रजिस्ट्रेशन करून देतो असे सांगून पाच गाड्यांसाठी आरटीजीएसद्वारे एकूण 27 लाख 20 हजार रुपये बँक खात्यात घेतले. तसेच या गाड्या रजिस्टर करून न देता अथवा त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याबद्दल चार जणांविरूद्ध पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पनवेल जवळील शिरढोण गावाच्या हद्दीत श्री बालाजी हॉटेल लॉजिंग एन्ड बोर्डिंगमध्ये भाड्याने रूम घेऊन ऑटो ऑक्शन इंडिया नावाने आरोपींनी कार्यालय उघडले होते. येथे बीएस-4 इंजिन मेकच्या भारत सरकारने मार्च 2019 पासून बंद केलेल्या नवीन चारचाकी गाड्या ऑटोमोटीव्ह मॅन्युफॅक्चर्स प्रा.लि.मी. यांच्याकडून मारूती सुझुकीच्या सियाझ, ब्रिजा, सेलेरियो, वॅगेनर, इको, बलेनो, एस क्रॉस अशा चारचाकी नवीन गाड्या स्क्रॅपमध्ये विकत घेतल्या होत्या. त्या स्क्रॅप करण्याऐवजी पुराच्या पाण्यात खराब झाल्याचे सांगून कमी किंमतीत अनधिकृतपणे जुन्या रजिस्टर गाड्यांचे इंजिन नंबर व चेसिस नंबर हे बीएस-4 इंजिन मेकच्या नवीन गाड्यांवर चढवून त्याद्वारे बनावट कागदपत्रे बनवून विक्री करण्यात येत होती.

अयुम एनके देव या व्यक्तीकडून बीएस-4 इंजिन मेकच्या नवीन गाड्या हरियाणा येथून रजिस्ट्रेशन करून देतो असे सांगून पाच गाड्यांसाठी आरटीजीएसद्वारे एकूण 27 लाख 20 हजार रुपये बँक खात्यात घेण्यात आले. या गाड्या रजिस्टर करून न देता अगर त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याबद्दल आरोपी शाबान रफिक कुरेशी (वय 32), मनोहर प्रसाद वेंकटराव जाधव (वय 21), आनम असलम सिद्दीकी

(वय 42) व वसिम महोम्मद उमर शेख (वय 31) या चौघांविरूद्ध गुन्हे शाखा मध्यवर्ती कक्ष यांनी या ठिकाणी छापा टाकून पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांना महाराष्ट्र प्रदेश भाजप चिटणीसपदाची मोठी जबाबदारी

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा …

Leave a Reply