Breaking News

‘ऑल इंडिया सिफेरर्स’ची वार्षिक सभा

पनवेल : वार्ताहर

ऑल इंडिया सिफेरर्स अ‍ॅण्ड जनरल वर्कर्स यूनियनची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. या वेळी यूनियनचे पदाधिकारी, शिपिंग क्षेत्रातील मान्यवर आणि सभासद उपस्थित होते.

या वेळी संस्थापक अध्यक्ष संजय वासुदेव पवार, कार्यअध्यक्ष अभिजीत दिलीप सांगळे, खजिनदार शितल शिवाजीराव मोरे, राष्ट्रीय उपाध्यक्ष संग्राम सोंडगे, सभेसाठी कॅप्टन सुनील पाठक, स्वरूप पाटील, अ‍ॅड. अरुण जोशी, गणेश पवार, प्रमोद कुमार सिंग, निरंजन देशमुख, दत्ता चौगुले, आश्विन अघामकर, सुरेश खाडे, बबलू सिंग यादव, सुजीत पोळ, विकास कांबळे, विघ्नेश कोळी आणि कार्यकर्ते, सभासद उपस्थित होते.

या सभेत नवीन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिपिंग क्षेत्रात झालेले बदल आणि निर्माण झालेल्या अडचणी सांगण्यात आल्या. वार्षिक आर्थिक अहवाल, यूनियनचे मेंबर्स वाढवण्यासंबंधी सूचना, मागील वर्षीच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडण्यात आला. वर्षभरात केलेल्या कामांची चित्रफीत देखील दाखवण्यात आली. डॉ. अमोल मोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती पाटील, सभेची संपूर्ण व्यवस्थापणेची जबाबदारी अक्षय कोळी आणि रोशन कोळी या युवा कार्यकर्त्यांनी उत्तमरित्या झाली.

Check Also

करिअरविषयक मार्गदर्शन सत्राला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पनवेल : रामप्रहर वृत्तसध्या जगात एआय तंत्रज्ञानावर आधारित सर्वाधिक संधी असल्यामुळे विद्यार्थ्यांनी एआयसोबत लवकरच परिचित …

Leave a Reply