Breaking News

महाडमधील बंद कॉलनीत आढळला मानवी सांगाडा

महाड : प्रतिनिधी

येथील औद्योगिक क्षेत्रातील इंटरनॅशनल होम टेक प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची त्रिंबक) या बंद कंपनीच्या कामगार वसाहतीमध्ये दोन वर्षापूर्वीचा मानवी सांगाडा सापडल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 16) उघडकीस आली.

 पुणे येथील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेत असलेला सौरव अरूणकुमार दास (वय 22 रा. पीडीलाईट कॉलनी) सुट्टीनिमित्त आपल्या घरी आल्यानंतर मंगळवारी फेरफटका मारण्याकरिता गेला असता त्याला हा मानवी सांगाडा आढळून आला. त्याने त्याची खबर एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली.

या अनोळखी मानवी सांगाड्याची ओळख पटविण्यासाठी तो मुंबई येथील जे. जे. रुग्णालयात पाठविण्यात आला असून, डीएनए टेस्टकरिता मांडीचे हाड व दात तपासणीकरिता पोलिसांनी मुंबई येथील फॉरेन्सिक लॅबकडे पाठविले आहेत. या घटनेची नोंद महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या अकस्मात मृत्यू अशी करण्यात आली आहे. पुढील तपास उपनिरीक्षक सागर पवार करीत आहेत.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply