तिसर्‍या कसोटीसाठी भारताची विशेष रणनीती

अहमदाबाद : वृत्तसंस्था
मोटेरा येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर गुलाबी चेंडूने प्रकाशझोतात खेळवण्यात येणार्‍या इंग्लंडविरुद्धच्या तिसर्‍या कसोटीसाठी भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराचे पुनरागमन निश्चित असून, फिरकीपटू कुलदीप यादवला संघातील स्थान गमवावे लागू शकते.
तिसरी कसोटी गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार असून अहमदाबादची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक ठरण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे गुलाबी चेंडू सायंकाळच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर स्विंग होतो. म्हणूनच बुमरा, इशांत आणि सिराज या वेगवान त्रिकुटाला भारतीय संघ व्यवस्थापन पसंती देण्याची शक्यता आहे, तर कुलदीप यादवच्या जागी अष्टपैलू हार्दिक पांड्याला जागा मिळू शकते. अक्षर पटेलने पहिल्या कसोटीत चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे त्याला तिसर्‍या कसोटीत संधी दिली जाईल अशी चिन्हे आहेत.
खेळाडूंनी केला कसून सराव
भारतीय संघाने बुधवारपासून इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणार्‍या दिवस-रात्र कसोटीपूर्वी नव्या मोटेरा स्टेडियममध्ये स्विंग होणार्‍या गुलाबी चेंडूवर सराव केला. कर्णधार विराट कोहलीने या सराव सत्राचे नेतृत्व केले. कर्णधार कोहलीसह उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा व यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत यांनी फलंदाजीचा सराव केला, तर जसप्रीत बुमरा व मोहम्मद सिराज उन्हात धावत सराव करताना दिसले.

Check Also

Test post title

Test post content

Leave a Reply