Breaking News

परळी ग्रामपंचायतीला रुग्णवाहिकेची भेट

सिटेक कंपनीने जपली सामाजिक बांधिलकी

पाली : प्रतिनिधी

सिटेक कंपनीच्या सीएसआर फंडातून सुधागड तालुक्यातील परळी ग्रामपंचायतीला सर्व सोयींनी युक्त अशी रूग्णवाहिका भेट देण्यात आली आहे. या रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा नुकताच परळी येथे पार पडला.

सिटेक कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर नासीर मुलाणी, तहसीलदार दिलीप रायन्नावार यांची या वेळी समोयोचीत भाषणे झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाविन मजेठिया यांनी केले. परळी ग्रामपंचायतीला सुसज्ज रुग्णवाहिका मिळावी यासाठी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य राजेश परदेशी व त्यांच्या सहकार्‍यांनी विशेष मेहनत घेतली. 

सुधागडचे गटविकास अधिकरी गजानन लेंडी, तालुका वैद्यकीय अधिकरी डॉ. मुळे, परळीचे उपसरपंच महेश ठाकूर, ग्रामसेवक ए. एम. खेडकर, रविशेठ ओसवाल, अ‍ॅड. प्रविण कुंभार, दीपक गायकवाड, राजेश परदेशी, संतोष देशमुख, केतन देसाई, उदय धुमाळ यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य आणि ग्रामस्थ या वेळी उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply