Breaking News

संघर्ष हाच यशाचा मार्ग -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांच्या प्रमुख उपस्थितीत ‘सीकेटी’त विद्यार्थी सत्कार

पनवेल : रामप्रहर वृत्त
संघर्ष हाच यशाचा मार्ग आहे त्यामुळे पदवी घेऊन शांत राहू नका तर पुढच्या पदव्या पण प्राप्त करा, अशा सल्ला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. खांदा कॉलनीमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज (स्वायत्त) येथे प्रथम, द्वितिय, तृतीय वर्ष पदवी, पदव्युत्तर वर्गातील व विद्यावाचस्पती (पी.एच.डी.) पदवी प्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा रविवारी (दि.13) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे स्फुर्तिस्थान स्व.चांगु काना ठाकूर साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनाचे औचित्य साधून झाला. या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद महादेव कारंडे व संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य आमदार प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.
मुख्य अतिथी मुंबई विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रसाद महादेव कारंडे यांनी, भारतीय संस्कृतीने शिकवलेल्या उदात्त विचारसरणीचा आपल्या अभ्यासक्रमात भारतीय ज्ञान प्रणालीच्या माध्यमातून समावेश झाला ही अत्यंत महत्वपूर्ण गोष्ट आहे, तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरणामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील करिअरची दारे खुली झाली आहेत व त्याचा सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी त्याचा लाभ करून घ्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
या कौतुक सोहळ्यामध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविले. यानंतर पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थितांना संबोधित करताना भविष्यातील संधींचे सोने करण्यासाठी येणार्‍या आव्हानांवर स्वार होऊन पुढे जाण्याचा संदेश देत, जागतिक पातळीवरच्या आव्हानांसाठी सज्ज राहण्यास सांगितले. तर लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी भाषणात प्रत्येक विद्यार्थ्यांने मराठी भाषेचा अभिमान बाळगला पाहिजे, असे सांगून विद्यार्थ्यांना पुढच्या भविष्यातील वाटचालींसाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ भगत, व्हाईस चेअरमन वाय.टी. देशमुख, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य अनिल भगत, पनवेल महापालिकेच्या माजी उपमहापौर सिताताई पाटील, संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय भगत, स्वप्नील ठाकूर, माजी नगरसेविका हेमलता म्हात्रे, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव तसेच महात्मा फुले कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, पनवेलचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, अ‍ॅड. राहुल घरत, अतुलशेठ भगत व संस्थेचे सचिव डॉ. एस. टी. गडदे आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली.
स्व.चांगु काना ठाकूर यांचे पुण्यस्मरण आणि त्यांच्या आदर्श विचारांचा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी आयोजिलेल्या या सोहळ्याची सुरुवात ईशस्तवन आणि स्वागतगीताने झाली. प्राचार्य प्रो. डॉ. एस. के. पाटील यांनी मान्यवरांचे स्वागत केले. त्याचबरोबर आपल्या भाषणामध्ये महाविद्यालयातील गौरवशाली परंपरांचा आढावा घेतला. तसेच अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली.
या सोहळ्यामध्ये सर्व पालक व गुणवंत विद्यार्थ्यांचे चांगु काना ठाकूर कॉलेजचे प्राचार्य प्रो.डॉ. एस. के. पाटील यांनी कौतुक केले. तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यार्थी परिषद आणि विद्यार्थी कल्याण कक्षाचे प्रभारी डॉ. एस. एन. परकाळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक प्रो. डॉ. बी. डी. आघाव व महिला विकास कक्षाच्या अध्यक्षा डॉ. आर.डी.म्हात्रे यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली.
सूत्रसंचालन डॉ. आर. व्ही. येवले, प्रा. ए. व्ही. पाटील, प्रा. एन. एच. कडु तर आभारप्रदर्शन डॉ. एस. एन. परकाळे यांनी केले, तसेच या कार्यक्रमासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply