Breaking News

मिताली दस हजारी मनसबदार; 10 हजार धावा करणारी पहिली भारतीय महिला खेळाडू

मुंबई ः प्रतिनिधी

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 10 हजार धावांचा टप्पा ओलांडला आहे. अशी कामगिरी करणारी मिताली ही पहिली भारतीय क्रिकेटपटू ठरली आहे. सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका महिला संघांमध्ये एकदिवसीय मालिका सुरू असून, त्यात मितालीने हा विक्रम आपल्या नावे केला आहे. तिने मैलाचा दगड पार करताच बीसीसीआयने ट्विट करून तिला शुभेच्छा दिल्या आहेत. 10 हजार धावा पूर्ण करण्यासाठी मितालीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीमध्ये आतापर्यंत 310 सामने खेळले आहेत. त्यात 10 कसोटी सामने, 211 एकदिवसीय सामने आणि तब्बल 82 टी-20 सामन्यांचा समावेश आहे. 999मध्ये आयर्लंडविरुद्धच्या सामन्याद्वारे मिताली राजने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. जवळपास 22 वर्षांहून अधिक काळ ती भारताचे प्रतिनिधित्व करीत आहे. याआधी इंग्लंडच्या शेरलोट एडवर्ड्सने 10 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. 10 हजार 273 धावांनंतर एडवर्ड्स निवृत्त झाली, पण मिताली अजूनही खेळत असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा बहुमानदेखील मिताली लवकरच मिळवेल, असे चित्र दिसत आहे.

Check Also

भाजपकडून महिला सक्षमीकरणासाठी बळ दिले जाते -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्ष नेहमीच महिलांना शक्ती देण्याचे आणि त्यांना सक्षम करण्याचे काम …

Leave a Reply