अलिबाग : प्रतिनिधी : अलिबाग येथे वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या नव्या इमारतीचे कोनशिला अनावरण आज मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती तथा पालक न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी रायगड-अलिबागचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी उपस्थित होते. अलिबाग येथील विधी सेवा प्राधिकरण येथे हे केंद्र असणार आहे. या वेळी बोलताना न्यायमूर्ती रियाज छागला म्हणाले की, लोकअदालत ही संकल्पना 1994 पासून गुजरातेतील जुनागढ येथे सुरू झाली. राज्यघटनेनुसार गरीब व गरजू घटकांना न्याय देणे, पक्षकारास न्याय मिळवून देण्यासंदर्भात मोफत सुविधा देणे हे आमचे कर्तव्य आहे. येथील प्रस्तावित वैकल्पिक वाद निवारण केंद्राची इमारत पक्षकारांसह सामान्य जनतेलाच नव्हे, तर न्यायव्यवस्थेतील प्रत्येक घटकाला नवी दिशा देणारी ठरणार आहे. पक्षकार, वकील व न्यायालय यांच्यातील दुवा म्हणून ही यंत्रणा उपयोगी ठरणार आहे, असेही ते म्हणाले. या वेळी रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अलिबाग विधिज्ञ संघाचे अॅड. प्रवीण ठाकूर, जिल्हा विधी सेवा संघाचे अॅड. प्रसाद पाटील, सचिव जयदीप मोहिते आदी उपस्थित होते.
Check Also
पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध
पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …