
पनवेल ः रामप्रहर वृत्त
भाजप नगरसेवक नितीन पाटील यांच्या नगरसेवक निधीतून पायोनिअर विभागात बस थांबा, मिनी हायमास्ट तसेच तालुका पोलीस स्टेशनजवळ मिनी हायमास्ट व उपजिल्हा रुग्णालय ते ज्येष्ठ नागरिक हॉल येथे पथदिवे अशा विविध विकासकामांचे लोकार्पण शुक्रवारी (दि. 12) पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या कार्यक्रमास नगरसेवक अनिल भगत, माजी नगरसेविका सुहासनी शिवणेकर, माजी नगरसेवक प्रदीप सावंत, डी. आर. भोईर, माजी नगरसेविका नीता माळी, भाजप उत्तर रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर, भाजप पनवेल शहर महिला मोर्चा सरचिटणीस लीना पाटील, उत्तर रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य उमेश इनामदार, सोशल मीडिया सेल शहर संयोजक प्रसाद हनुमंते, शहर सहसंयोजक मनोज पाटील, सोशल मीडिया शहर सदस्य रूपेश नागवेकर, प्रभाग क्र. 18 अध्यक्ष चंद्रकांत पाटील, सचिन पाटील, जयश्री तांबोळी, आदिती मराठे, उपेंद्र मराठे, महेश सरदेसाई, विजय डिसोझा, सागर मंगवणी, सनी बैद, मयूर चिटणीस, संदेश भोईर, राजा चव्हाण, राजेंद्र पाटील, अभिजित दातार, प्रवीण काणे तसेच प्रभागातील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रभागात विविध विकासकामे करण्यासंदर्भात नगरसेवक नितीन पाटील नेहमीच पुढे राहिले आहेत. नागरिकांना काय हवे याची जाणीव ठेवून ते आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत मूलभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देतात. त्या अनुषंगाने विकासकामे केल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नागरिकांनी त्यांना धन्यवाद देऊन आभार व्यक्त केले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper