पनवेल ः रामप्रहर वृत्त
एल अॅण्ड टी कोमास्तु कंपनी आणि ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेडचे मागील दोन दशकांहून अधिक काळ कन्स्ट्रक्शन व्यवसायानिमित्त चांगले व दृढ नाते आहे. त्या अनुषंगाने एल अॅण्ड टी कोमास्तुने वर्षानुवर्षे आदरणीय व निष्ठावंत ग्राहक असल्याबद्दल ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान केला.
कन्स्ट्रक्शन क्षेत्रासाठी टीआयपीएल कंपनीने एल अॅण्ड टी कोमास्तु कंपनीची उपकरणे उपयोगात आणली असून, या कंपनीवर गेल्या दोन दशकांहून अधिक काळ विश्वास कायम ठेवल्याबद्दल एल अॅण्ड टी कोमास्तुचे वरिष्ठ डीजीएम पश्चिम विभागप्रमुख मनीष परब, सहाय्यक महाव्यवस्थापक शैलेश कुलकर्णी, सचिन कर्ले यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेऊन ठाकूर इन्फ्राप्रोजेक्ट कंपनी आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा एल अॅण्ड टी कोमास्तु कंपनीच्या वतीने सन्मान करून आदर व कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी टीआयपीएलचे व्यवस्थापक (परचेस विभाग) आनंद लाल उपस्थित होते.
Check Also
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते नावेखाडीत शिवमंदिर जीर्णोद्धार सोहळा आणि श्रींची पुनःप्रतिष्ठापना
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील नावेखाडी मधलापाडा येथे शिवमंदिर जीर्णोद्धार आणि श्रींची पुनःप्रतिष्ठापना सोहळा माजी …