मुंबई ः प्रतिनिधी
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलीया निवास्थानाबाहेर स्फोटकांसह आढळलेल्या स्कॉर्पिओ कारप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेले निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे सध्या कोठडीत आहेत. एएनआयने सोमवारी उशिरा रात्री मुंबई पोलिसांच्या अधिकार्यांच्या उपस्थितीत क्राइम इंटेलिजन्स युनिटची (सीआययू) झाडाझडती घेऊन वाझे यांचा कम्प्युटर, मोबाइल आणि महत्त्वाची कागदपत्रे हस्तगत केली आहेत.
एनआयएकडून आतापर्यंत सीआययूच्या सात अधिकार्यांची चौकशी करण्यात आली आहे. पुरावे मिळविण्याच्या उद्देशाने एनआयएने ही झाडाझडती घेतली. मुंबई पोलिसांच्या अधिकार्यांच्या समोर एनआयएने सीआययू कार्यालयात सर्च ऑपरेशन केले आहे.
मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नवीन इमारतीत सीआययूचे कार्यालय आहे. या कार्यालयातून एनआयएच्या पथकाने सचिन वाझे यांचा मोबाइल, कम्प्युटर आणि महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली. त्यामुळे सचिन वाझेंबाबत मोठे खुलासे होऊ शकतात.
Check Also
उलवेत 13 मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभीष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे …
RamPrahar – The Panvel Daily Paper