Breaking News

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन

आमदार प्रवीण दरेकर यांची उपस्थिती

पोलादपूर ः प्रतिनिधी
केंद्रात व राज्यात भाजपच सत्तेचा खरा दावेदार असून, खेडोपाडी दुर्गम भागांमध्येही विकासाची मानसिकता असलेला हा एकमेव पक्ष आहे, असे प्रतिपादन भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोमवारी (दि. 29) येथे केले. पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथे विविध विकासकामांच्या उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते.
पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुक येथील धनगरवाडी रस्ता, कोतवाल बुद्रुक बौद्धवाडी येथील सिमेंट काँक्रीट रस्ता व संरक्षक भिंतीचा उद्घाटन सोहळा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते झाला.
 पोलादपूर तालुक्यातील कोतवाल बुद्रुक या जन्मगावी आमदार प्रवीण दरेकर हे दरवर्षी शिमगोत्सवामध्ये ग्रामस्थांसोबत सहभागी होतात. या वेळी आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले की, कोतवाल गावाची ग्रामदेवता आई कुंभळजय, जननी व काळकाई मंदिराच्या जीर्णोद्धारानंतर कोतवाल गावी येण्याचे निमित्त वाढले असून प्रत्येक भेटीत जसे ग्रामस्थांचे प्रेम व ग्रामदैवतांचा आशीर्वाद मिळतो, त्याचप्रमाणे गावाच्या विकासाची संधीदेखील मला मिळत आहे आणि ही सेवा माझ्याकडून घडत असल्याने मला त्याचा अभिमान वाटत आहे.
या वेळी पोलादपूरच्या तहसीलदार दीप्ती देसाई, भाजप जिल्हा उपाध्यक्ष बिपीन महामुणकर, कोतवालचे सरपंच गणेश कदम, माजी राजिप सदस्य मुरलीधर दरेकर, माजी सरपंच परशुराम दरेकर, महा ई-सेवा केंद्र संचालक संदेश सकपाळ, प्रकाश दरेकर, विजय दरेकर, कृष्णकांत दरेकर तसेच पोलादपूर तालुका अध्यक्ष प्रसन्ना पालांडे, महेश निकम आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …

Leave a Reply