Breaking News

शौचालयात आढळला कोरोना रुग्णाचा मृतदेह

औरंगाबादच्या सरकारी रुग्णालयातील घटना

औरंगाबाद : प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा कहर वाढत असून, रुग्णांची हेळसांड होऊ लागली आहे. औरंगाबादमध्ये जिल्हा रुग्णालयात एका कोरोना रुग्णाचा शौचालयात गुदमरून मृत्यू झाल्याच समोर आले आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
गुलाबराव ढवळे असे रुग्णाचे नाव आहे. रुग्ण साडेचार तासांपासून परत न आल्याने इतरांनी तक्रार केल्यानंतर स्वच्छतागृहात जाऊन तपास घेतला असता, स्वच्छतागृहाचे दार बंद होते. दरवाजा तोडून पाहिल्यानंतर रुग्ण बेशुद्ध अवस्थेत पडल्याचे दिसून आले. रुग्णाची तत्काळ तपासणी केल्यावर त्याचा मृत्यू झाला असल्याचे स्पष्ट झाले.
रुग्ण तब्बल साडेचार तास ऑक्सिजनविना शौचालयात पडून होता. त्यानंतरही जिल्हा रुग्णालयाच्या प्रशासनाने त्यांच्याकडे कुठलेही लक्ष दिले नाही व त्यामुळे त्याचा मृत्यू झाला, असा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे, तसेच दोषींवर कारवाई करण्याची मागणीही नातेवाइकांनी केली आहे.

Check Also

गव्हाण ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयांवर चर्चा

उलवे नोड : रामप्रहर वृत्तपनवेल तालुक्यातील गव्हाण ग्रामपंचायतीत महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित ग्रामसभा शुक्रवारी (दि.१) माजी …

Leave a Reply