Breaking News

सुभाष पुजारी यांची मिस्टर एशिया आणि मिस्टर वर्ल्ड शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी निवड

पनवेल ः वार्ताहर

येथील महामार्ग पोलीस दलातील सहाय्यक निरीक्षक सुभाष पुजारी यांची मिस्टर एशिया आणि मिस्टर वर्ल्ड या शरीरसौष्ठव स्पर्धांसाठी निवड झाली आहे. याबद्दल त्यांचे अभिनंदन होत असून अनेकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. भारतीय बॉडी बिल्डिंग फेडरेशन व हिमाचल प्रदेश बॉडीबिल्डिंग फेडरेशन यांच्या वतीने हिमाचल प्रदेशमधील पोवंटा साहिब या ठिकाणी भारतीय बॉडीबिल्डिंग संघ निवड चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये सुभाष पुजारी यांची 80 किलो वजनी गटात भारतीय संघात निवड करण्यात आली. मि. अशिया ही स्पर्धा मालदिव येथे 15 ते 21 जुलैदरम्यान होणार आहे, तर मि. वर्ल्ड स्पर्धा थायलंड फुकेतया ठिकाणी 6 ते 12 डिसेंबरदरम्यान होणार आहे. या दोन्ही स्पर्धांसाठी सुभाष पुजारी हे दररोज पाच तास वन अबोव जिम नेरूळ व वाशी येथे आंतरराष्ट्रीय खेळाडू मिस्टर युनिव्हर्स सुनित जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत. पुजारी यांना वर्ल्ड बॉडीबिल्डिंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी चेतन पाठारे, लिगल अ‍ॅडव्हायझर विक्रम रोठे वर्ल्ड यांचे मार्गदर्शन लाभले. या निवडीबद्दल त्यांचे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, डॉ. भूषणकुमार उपाध्याय, अप्पर महासंचालक विनय कारगावकर, अनुपकुमार सिंह, नवी मुंबई अप्पर पोलीस आयुक्त डॉ. जय जाधव, महामार्ग (पुणे) पोलीस अधीक्षक संजय जाधव, पनवेल महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पोलीस खात्यातील त्यांचे सहकारी, मित्र तसेच सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Check Also

सर्वांनी शिवरायांचे विचार जगायला हवेत -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तछत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती गव्हाण यांच्यातर्फे छत्रपती शिवाजी महाराज जयंती …

Leave a Reply