महाड ः प्रतिनिधी
किल्ले रायगड येथील रोप वे देखभाल-दुरुस्तीसाठी 16 दिवस बंद राहणार असल्याची माहिती रोप वे व्यवस्थापनाकडून देण्यात आली आहे.
हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड पाहण्यासाठी लॉकडाऊननंतर मोठ्या संख्येने पर्यटक येत असून, रोप वेवर गर्दी होत आहे. चार चार तास पर्यटकांना रांगेत रहावे लागते. 3 ते 18 एप्रिलदरम्यान हा रोप वे देखभाल-दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती मिलेनियम प्रॉपर्टीज रायगड रोप वे या कंपनीच्या व्यवस्थापनाकडून देण्यात आली.
Check Also
संत रोहिदास महाराज जयंती भाजपतर्फे विविध कार्यक्रमांनी होणार साजरी
आमदार प्रशांत ठाकूर यांच्या उपस्थितीत नियोजन बैठक पनवेल : रामप्रहर वृत्तसंत रोहिदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त …
RamPrahar – The Panvel Daily Paper