आमदार प्रशांत ठाकूर यांनी नगरसेवकांसह केली पाहणी
पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीतील सिद्धी करवले गावासह आजुबाजूच्या परिसरात रामकी कंपनीच्या इंडस्ट्रीयल हझार्ड्स वेस्टवर प्रक्रिया करणार्या प्रकल्पामुळे हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. या प्रदुषणामुळे परिसरातीन नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी (दि. 9) नगरसेवकांसह या परिसराची पाहणी केली.
रामकी कंपनीमार्फत इंडस्ट्रीयल हझार्ड्स वेस्टवर प्रक्रिया केली जाते. या प्रकल्पामुळे शेजारील एक किलोमीटरच्या परिसरातील गावामंध्ये हवेचे आणि पाण्याचे प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी गावकरी करीत आहेत. या परिसरामध्येच सिडकोचा घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया करण्याचा प्रकल्प आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना श्वसनाचा त्रास, दमा तसेच अन्य आजार जडलेले आहेत. लहान मुलांच्या आरोग्यावरही याचा विपरित परिणाम होत आहे, तसेच पाण्याच्या प्रदुषणामुळे शेती आणि इतर उत्पादनांवर परिणाम झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर यांनी परिसराची पाहणी करून नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता या समस्या सोडवाव्यात, असे सांगितले. या वेळी नगरसेवक हरेश केणी यांनी हा प्रकल्प बंद करण्याची मागणी केली.
या पाहणी दौर्यात भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप नेते निर्दोश केणी, पोलीस पाटील, अविनाश मढवी, रमेश मढवी, गोपीनाथ पाटील, माजी सरपंच संतोष मढवी, एस. के पाटील, लालचंद मढवी, हेमंत पाटील, वासुदेव मढवी, प्रवीण मढवी, नितीन मढवी, प्रदीप पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ उपस्थित होते.