Breaking News

नागोठणे रोटरी क्लबकडून मदत केंद्राची सुविधा

नागोठणे : प्रतिनिधी

शहरासह विभागातील अनेक नागरिकांना कोविड लसीकरणसंदर्भात माहिती जाणून घेता येत नसल्याने त्यांना सहकार्य करण्याच्या भूमिकेतून येथील रोटरी क्लबच्या वतीने लसीकरणाचे ऑनलाइन अर्ज भरणे तसेच इतर माहिती मिळण्याच्या दृष्टीने बाजारपेठेत मदत केंद्र चालू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन  शुक्रवारी (दि. 9) दुपारी सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांचे हस्ते करण्यात आले.

जनतेचे आरोग्य चांगले राहावे, या दृष्टीने रोटरी क्लब कायम सक्रिय असून,  क्लब कोरोना आणि लसीकरण या संदर्भात जनजागृती मोहीम राबविणार आहे. यासाठी शहरातील प्रत्येक आळी तसेच चौकांमध्ये फलक लावणार असल्याचे अध्यक्ष सचिन मोदी यांनी या वेळी सांगितले.

नागोठणे ग्रामपंचायत सदस्य मोहन नागोठणेकर, ज्ञानेश्वर साळुंके, आनंद लाड, डॉ. अभिषेक शहासने, श्रेया कुंटे, नीलिमा राजे, मांगीलाल जैन, मांगीलाल चौधरी, धीरज मोदी या वेळी उपस्थित होते.

Check Also

अजितदादांच्या निधनाने कबड्डी खेळाचे मोठे नुकसान -लोकनेते रामशेठ ठाकूर

पनवेल ः रामप्रहर वृत्तमातीतल्या खेळांपैकी एक कबड्डीचा आधारस्तंभ असलेले अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या खेळाचे …

Leave a Reply