Breaking News

‘सीकेटी’चे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

पनवेल : रामप्रहर वृत्त
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे नवीन पनवेलमधील चांगू काना ठाकूर (सीकेटी) मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयाचे 27वे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा रविवारी (दि. 8) चांगू काना ठाकूर शिक्षण संकुलाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात आणि आनंदात पार पडला. या स्नेहसंमेलन सोहळयाला प्रमुख अतिथी रायगड जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) पुनिता गुरव आणि कल्याणमधील छत्रपती शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी तसेच विशेष अतिथी संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य संजय शंकर पाटील, श्रीवर्धन पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी नवनाथ साबळे साहेला, पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक समीर ठाकूर, माजी नगरसेविका राजेश्री वावेकर, सुशीला घरत, पुण्यातील कॅनरी फार्म आणि आयलँड मुळशीचे डायरेक्टर मिलिंद नंदकुमार वाळंज आदी उपस्थित होते. स्नेहसंमेलन सोहळ्याचे अध्यक्षस्थान संस्थेच्या कार्यकारी मंडळ सदस्य प्रकाश जनार्दन भगत यांनी भूषविले होते पुनिता गुरव व डॉ. नंदकिशोर जोशी यांच्या हस्ते शैक्षणिक वर्ष 2022-2023 या मराठी पूर्व प्राथमिक व प्राथमिक विभागाच्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. कला चिल्ड्रन अ‍ॅकॅडमी मुंबई यांच्यातर्फे ’अ‍ॅक्टीव्ह स्कूल अ‍ॅवॉर्ड’ मिळाल्याबद्दल मिलिंद नंदकुमार वाळंज यांच्या हस्ते मुख्याध्यापक मानकर यांना सन्मानित करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते कला, क्रिडा व सांस्कृतिक क्षेत्रात यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याना पारितोषिके देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. तसेच शिक्षक-पालक संघातर्फे घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांची पारितोषिके मान्यवरांच्या हस्ते देऊन पालकांना व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले. मुख्याध्यापक सुभाष मानकर यांनी 100 गडकिल्ल्यांचा ट्रेक व सोशल मिडियाच्या माध्यमातून गडकिल्ल्यांची माहिती लोकांपर्यत पोहचविण्याचे कार्य केल्याबदद्ल संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते. त्याबद्दल त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच कला चिल्ड्रन अ‍ॅकॅडमी मुंबई यांच्यातर्फे ’अ‍ॅक्टीव्ह मुख्याध्यापक’आणि गौतम एज्युकेशन सोसायटी, इचलकरंजी यांच्यातर्फे ’कलामित्र’ पुरस्कार देण्यात आला होता त्याबद्दल मुख्याध्यापक सुभाष मानकर यांना सन्मानित करण्यात आले. विजयश्री जनार्दन थळी यांना कला चिल्ड्रन अ‍ॅकॅडमी मुंबई यांच्यातर्फे ’अ‍ॅक्टीव्ह टिचर अ‍ॅवॉर्ड’ तसेच गौतम एज्युकेशन सोसायटी, इचलकरंजी यांच्यातर्फे ’उपक्रमशील शिक्षिका’ पुरस्कार देवून गौरविण्यात आले होते त्याबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले. स्नेहसंमेलन सोहळ्याला जीवन दीप प्रकाशनचे मॅनेजर गोरखनाथ पोळ, जगदीश घरत, रोटरी क्लब पनवेलचे अध्यक्ष ऋग्वेद कांडपिळे, सीमा प्रकाश भगत, मोहिका भुजबळ/कांडपिळे तसेच सी.के.टी इंग्रजी माध्यमिक मुख्याध्यापक संतोष चव्हाण, मराठी माध्यमिक मुख्याध्यापक कैलास सत्रे, इंग्रजी-पूर्व प्राथमिक व प्राथमिक मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, उच्च माध्यमिक पर्यवेक्षक श्री. सोनावणे, मराठी माध्यमिक पर्यवेक्षक कैलास म्हात्रे, इंग्रजी पूर्व प्राथमिक पर्यवेक्षिका संध्या अय्यर, सहा. शिक्षक प्रदीप देशमुख, सहा. शिक्षक युवराज धनवटे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन सहा.शिक्षक पंढरीनाथ जाधव यांनी केले. संगीत शिक्षिका अर्चना पाटील व त्यांच्या सहकार्‍यांनी कार्यक्रमाची सांगता केली.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply