Breaking News

राजे प्रतिष्ठानकडून कलाकारांना जीवनाश्यक वस्तू

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य

पनवेल : रामप्रहर वृत्त

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 70व्या वाढदिवसानिमित्त आयोजित 70 कार्यक्रमांतर्गत शनिवारी (दि.  24) पनवेल, रायगड, मुंबई व नवी मुंबई अशा ठिकाणच्या 70 गरजवंत ऑर्केष्ट्रा कलाकारांना राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे तांदूळ, तेल, साखर, बिस्कीट, डाळ या जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

गेले वर्षभर कोरोनामुळे मनोरंजनात्मक कार्यक्रम रद्द आणि यावर्षी पुन्हा लॉकडाऊन यामुळे विविध कलाकारांना पुन्हा उपासमारीने व आर्थिक कोंडीने ग्रासले होते. आजही कलाकारांनी काय करायचे हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे. याची जाणीव ठेवुन श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या राजे प्रतिष्ठान कामगार सेनेतर्फे महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक यांच्या संकल्पनेनुसार आर्थिक कोंडीत सापडलेल्या 70 कलाकारांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून जीवनाश्यक वस्तूंची मदत करण्यात आली.

या वेळी महाराष्ट्र सहचिटणीस केवल महाडिक, आशा कि किरण फाऊंडेशनचे अध्यक्ष बशीर कुरेशी, गीतकार मुकेश उपाध्ये, विकी उपाध्ये, प्रवीण मोहोकर, पनवेल शहराध्यक्ष अनुराग वाघचौरे व ओमकार मेहंदी आदी उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply