Breaking News

खैरवाडीतील आदिवासींना रेशनचे वाटप

पनवेल : वार्ताहर

नवी मुंबई गुन्हे शाखा अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. बी. जी. शेखर पाटील व पोलीस सहआयुक्त विनोद चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई गुन्हे शाखेच्या दानशूर व्यक्तींच्या मदत व सहकार्‍याने शुक्रवारी (दि. 23) पनवेल तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे खैरवाडी आदिवासीवाडीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

या वेळी राहणार्‍या हातावर पोट असणार्‍या सुमारे 75 गरीब व गरजू कुटुंबांना (सुमारे 500 व्यक्ती) 15 दिवस पुरेल एवढे तांदूळ, गव्हाचे पीठ, डाळ, मीठ, तेल, मसाले, बिस्किटे, चहा पावडर, साखर मास्क व सॅनिटायझर अशा दैनंदिन जीवनाश्यक वस्तूंचे त्यांचे गावात जाऊन वाटप करण्यात आले आहे.

या रेशन वाटपासाठी डॉ. बी. जी. शेखर पाटील, विजय चौहान, गुन्हे शाखा कक्ष2चे वरिष्ठ निरीक्षक गिरीधर गोरे, गुन्हे शाखा कक्ष-3चे वरिष्ठ निरीक्षक विनय कादबाने, अमली पदार्थ गुन्हे शाखेचे जयराज छापरिया, अनैतिक मानवी वाहतूक कक्ष गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक पराग सोनवणे, मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या वरिष्ठ निरीक्षक निवती कोल्हटकर, गुन्हे शाखा कक्ष-1चे वरिष्ठ  निरीक्षक सुनिल शिंदे व सर्व पोलीस कर्मचारी, खैरवाडी माजी सरपंच अनंता खैर, ग्रामपंचायत सदस्य आंकेश पांडव, पोलिस पाटील संघटना पनवेल तालुका अध्यक्ष संजय पाटील (मोर्बे),  भाजप वावंजे विभागीय अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते रविंद्र पाटील (कोंडले), समालोचक पिंटु म्हात्रे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply