पनवेल : रामप्रहर वृत्त
पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेने विविध घटकांना दिलेल्या अर्थसहाय्याप्रमाणे पनवेल महानगरपालिका हद्दीतील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य देण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका दर्शना भोईर यांनी केली आहे. यासंदर्भात
त्यांनी मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.
नगरसेविका भोईर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या संपूर्ण राज्यभर कोरोनाच्या महामारीने कहर केलेला असून राज्यात कोरोनाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता, आपण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कडक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत. या काळात जीवनावश्यक वस्तूंचे दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे, परंतु न्हावी, परवानाधारक रिक्षाचालक, परवानाधारक पथविक्रेते, जीम व्यवस्थापक, सुतार, कुंभार, शिंपी, इत्यादी छोटे व्यवसाय पुर्णतःहा बंद आहे. त्यामुळे आधीच गरीब परिस्थितील असलेला हा समाज लॉकडाऊनमुळे अधिक जास्त अडचणीत आलेला आहे.
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेने न्हावी, सुतार, कुंभार, शिंपी, इत्यादी छोटे व्यवसायिकांना प्रती 3000 हजार रुपये आर्थिक सहाय्य जाहीर केले आहे. त्याअनुषंगाने पनवेल महानगरपालिका हद्दीतील इत्यादी न्हावी, परवानाधारक रिक्षाचालक, परवानाधारक पथविक्रेते, जीम व्यवस्थापक, सुतार, कुंभार, शिंपी इत्यादी छोटे व्यवसायिकांचा सहानभूतीपूर्वक विचार करून या व्यवसायिकांना आर्थिक सहाय्य करावे.
RamPrahar – The Panvel Daily Paper