Breaking News

आयुक्त गणेश देशमुख यांची बदली रद्द करावी

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या विकासाच्या दृष्टिकोनातून काम करणारे आणि जनमानसात चांगली प्रतिमा उमटविणारे आयुक्त गणेश देशमुख यांची झालेली बदली रद्द करण्यात यावी, अशी मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.  
आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गणेश देशमुख यांनी पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त म्हणून कामभार हाती घेतल्यापासून महानगरपालिका हद्दीतील अनेक विकासकामांना गती देण्याचे काम केले असून, त्यांची जनमानसात चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे. सद्यस्थितीत राज्यात उद्भवलेल्या विशेषतः पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी व त्याला आळा बसण्यासाठी गणेश देशमुख चांगले प्रयत्न करीत आहेत. त्याचबरोबर कोरोनाच्या संकट काळात महापालिका आयुक्तांची बदली करणे हा पनवेलकरांवर अन्याय असल्याचेही आमदार प्रशांत ठाकूर यांनी नमूद केले आहे.
सद्यस्थिती पाहता पनवेल महानगरपालिका हद्दीत कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी प्रयत्न करणार्‍या व शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करणार्‍या गणेश देशमुख यांची झालेली बदली रद्द करून त्यांच्याकडे पनवेल महानगरपालिकेचा कारभार सोपविण्यात यावा, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी करीत समस्त पनवेलकरांची भावना यातून मुख्यमंत्र्यांकडे मांडली आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply