Breaking News

वादळामुळे बोटी किनार्यावर

मुरुड : प्रतिनिधी

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार मुरुड तालुकयातील सर्व मच्छिमारांनी आपल्या बोटी किनार्‍यावर साकारल्या आहेत. गेल्या चार – पाच दिवसांपासून बोटी किनार्‍यावर असल्याने मुरूडच्या बाजारात मासळी दिसेनासी झाली आहे. ताजी मासळी नसल्याने खवय्ये नाराज आहेत.

भारतीय हवामान विभागाने 14 ते 16 मे दरम्यान कोकण किनारपट्टीवर वादळी वार्‍यांसह पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे मच्छिमारांनी खोल समुद्रात जाऊ नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या होत्या. तटरक्षक दलाकडूनसुद्धा बोटींना किनार्‍यावर आणण्यात आले आहे. मुरूड परिसरातील सर्व बोटी 13 मेपासूनच किनार्‍यावर आल्याने येथील मासळी मार्केट ओस पडले आहे.

मच्छिमारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असतानाच या वादळामुळे बोटी किनार्‍याला आणाव्या लागल्या. त्यामुळे मच्छिमारांमध्ये नाराजी आहे. गेल्या दोन वर्षात मोठंमोठी संकटे आल्याने जिल्ह्यातील मच्छिमार कर्जबाजारी झाला आहे. त्याला शासनाने मदतीचा हात द्यावा, असे रायगड जिल्हा मच्छिमार संघाचे उपाध्यक्ष मनोहर बैले यांनी सांगितले.

Check Also

अमर भूपाळी होनाजी बाळा @७५ वर्षे : एक संगीतमय अजरामर कलाकृती

भारतीय चित्रपटसृष्टीच्या वाटचालीतील काही दर्जेदार (क्लासिक) चित्रपट पुन्हा पुन्हा पाहावेसे वाटतात आणि त्यात पुनर्प्रत्ययाचा आनंद …

Leave a Reply