भाजपतर्फे उद्या ऑनलाइन समुपदेशन

कामोठे : रामप्रहर वृत्त

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला रविवारी (दि. 30) सलग सात वर्ष पूर्ण होतील. त्यानिमित्त भाजप कामोठेच्या वतीने कामोठ्यातील नागरिकांच्या विशेषत: महिलांसाठी कोरोनाची तिसरी लाट व माझ्या मुलांची काळजी ह्या महत्त्वपूर्ण विषयावर ऑनलाइन समुपदेशन आयोजित केले आहे. कामोठ्यातील नामांकित बालरोगतज्ञ डॉ. शैलेश काबरा यांचे ऑनलाइन समुपदेशन संध्याकाळी 4 वाजता आयोजित केले आहे. कामोठ्यातील जास्तीत जास्त महिलांनी या व्हर्चुअल बैठकीत आपली उपस्थिती लावावी व आपल्या लहान मुलांची काळजी कशी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बॅठकीची लिंक ही 30 तारखेला सकाळी 11 वाजता पाठवण्यात येईल. त्या अगोदर आपल्या मोबाइलमध्ये वेबेक्स मीटिंगचे अ‍ॅप्लीकेशन प्लेस्टोरमध्ये जाऊन डाऊनलोड करावे. मीटिंगमध्ये तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनानंतर काही महिला त्यांना समस्या व प्रश्नदेखील विचारू शकतात. वेळे अभावी किंवा तांत्रिक कारणास्तव बोलण्याची संधी न मिळाल्यास चॅट बॉक्समध्येआपले प्रश्न विचारावेत. वक्त्यांनी बोलत असताना कृपया सर्वांनी आपला मोबाइल म्यूट करून ठेवावे, असेही आवाहन भारतीय जनता पक्ष कामोठे मंडल यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

Check Also

Vor die eine Auszahlung denkbar sei, in kraft sein halb wahrscheinlich Umsatzbedingungen

Bares unter anderem Bonusgewinne In welchem ausma? diese Gewinne schenke & amyotrophic lateral sclerosis Bonusgeld …

Leave a Reply