पेण : प्रतिनिधी
कोरोना महामारीवर मात करण्यासाठी आमदार रविशेठ पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून पेण विधानसभा मतदारसंघात औषधांच्या किटचे वाटप करण्यात येत आहे. पेण तालुक्याच्या हमरापूर विभागातील दादर, रावे, कळवे, सोनखार, जोहे, हमरापूर आदी गावांत जाऊन जि.प.चे माजी विरोधी पक्षनेते वैकुंठ पाटील यांनी औषधांचे किट वाटप केले. या वेळी भाजपचे लक्ष्मण जांभळे, सूर्यहास पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी सरपंच, ग्रामसेवक व आशा वर्कर यांना माहिती देऊन कोरोनाचा प्रसार रोखण्याचे आवाहन करण्यात आले.