Breaking News

भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीला यश; राज्यातील सर्वच विद्यापीठांसाठी शुल्क कपातीचा होणार निर्णय

पनवेल : वार्ताहर

राज्यभरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क न घेता शुल्कामध्ये सूट द्यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने राज्य सरकारकडे लावून धरली होती. या मागणीसाठी राज्यभर निदर्शने करून शुल्क कपातीची मागणी करत निषेध ही व्यक्त केला होता. याच महत्त्वपूर्ण विषयात विद्यार्थी आणि पालकांना त्वरित दिलासा द्यावा याकरिता भाजयुमो प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या प्रतिनिधी मंडळाने राज्यपालांचीही भेट घेऊन मागणी केली होती. नागपूर विद्यापीठातही संघर्षाची भूमिका घेत भाजयुमोने यशस्वी आंदोलन करीत या शुल्कात सूट मिळवून घेतली होती. त्याच निर्णयाचा आधार घेत राज्यातील सर्वच विद्यापीठांनी शुल्क कपात करावी, अशी घोषणा करणार असल्याची माहिती राज्याचे उच्च तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. यासंदर्भात भाजयुमोचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील म्हणाले की, ठीक आहे, देर आये-दुरुस्त आये. भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीचा सकारात्मक विचार करून विद्यार्थी व पालकांना दिलासा देण्याचा निर्णय करणार असल्याबद्दल  शिक्षणमंत्र्यांचे आभार. अजून महत्त्वाच्या दोन मागण्या प्रलंबित असून, सन 2020-21साठीही हा निर्णय लागू करावा आणि शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी सर्व शाळांना सुद्धा हा निर्णय लागू करावा. या मुख्य मागण्यांवर ही त्वरित सकारात्मक निर्णय करावा, अशी मागणी विक्रांत पाटील यांनी केली.

Check Also

पनवेलमध्ये एसआयआरसंदर्भात बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तमतदारयादी विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानासंदर्भात भाजप पनवेल विधानसभा मतदारसंघाचे बीएलए व …

Leave a Reply