मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माझा नातू पार्थ पवार अपरिपक्व असून, त्याच्या वक्तव्याला कवडीची किंमत देत नाही, असे वक्तव्य बुधवारी केले होते. यावरून राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा त्यांचा कौटुंबिक विषय असल्याचे म्हटले आहे.
फडणवीस म्हणाले, आता आजोबा आणि नातूमधील वाद, संवाद, विवाद जे काही असेल त्यात आम्ही काय बोलावं. हा त्यांच्या घरचा प्रश्न आहे. आजोबांनी नातवाला किंमत द्यायची की नाही हे आजोबांनी ठरवायचे आहे किंवा नातवाने आजोबांना आवडेल असे वागायचे की नाही हे नातवाने ठरवायचे आहे. त्या संदर्भात मी बोलणे योग्य ठरणार नाही.
बैठकांचा सिलसिला
शरद पवार यांनी नातू पार्थ पवारबाबत केलेल्या वक्तव्यानंतर बुधवारीच पार्थचे वडील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर दाखल झाले होते. त्या वेळी शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक झाली. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी (दि. 13) मंत्रालयात अजित पवार यांची भेट घेतली. 10 मिनिटे भेटून त्या मंत्रालयातून बाहेर पडल्या. या दोन्ही भेटींमध्ये नेमकी काय चर्चा झाली, हे मात्र समजू शकलेले नाही.
Check Also
रायगड तायक्वांडो असोसिएशनतर्फे बेल्ट परीक्षा उत्तीर्ण, आंतरराष्ट्रीय खेळाडूंचा गौरव
आमदार प्रशांत ठाकूर यांचा विशेष सत्कार पनवेल : रामप्रहर वृत्तरायगड तायक्वांडो असोसिएशनच्या वतीने बेल्ट परीक्षेत …