Breaking News

खानावमधील शेकाप कार्यकर्ते भाजपत

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल मतदारसंघामध्ये मावळ मतदारसंघातील भाजप- शिवसेना महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. त्याअंतर्गत मंगळवारी ग्रामीण भागात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी खानाव गावातील शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानाव गावातील शेतकरी कामगार पक्षातील कार्यकर्त्यांनी भाजप-शिवसेनेच्या सरकारने केलेली विकासकामे आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवाजी कर्णुक, बाबुराव कर्णुक, बाळाराम कर्णुक, आतिष कर्णुक, उमेश कर्णुक, अशोक कर्णुक, मंगेश कर्णुक, अनंथा कर्णुक, तुळशारामशेठ तातरे, एकनाथ कराड, दिलीप पाटील यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर पक्षप्रवेश केला आहे.

या वेळी शिवसेना, भाजप महायुतीचे मावळ मतदारसंघाचे उमेदवार श्रीरंग बारणे, सिडको अध्यक्ष तथा भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत, सल्लागार बबनदादा पाटील, भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply