अलिबाग ः प्रतिनिधी
लायन्स व लिओ क्लब ऑफ अलिबाग आणि लायन्स व लिओ क्लब ऑफ मुंबई अपटाऊन यांच्या संयुक्त विद्यमाने पदवीधर विद्यार्थ्यांच्या क्षमता विकासासाठी ‘उंची उडान’ या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 4 ते 26 सप्टेंबरदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात दर शुक्रवार व शनिवारी संध्याकाळी 7 ते 8.30 वाजेदरम्यान वेगवेगळ्या सॉफ्ट स्किल्ससंदर्भात कॉर्पोरेट क्षेत्रातील महनीय व्यक्तींच्या ऑनलाइन मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना घेता येईल, अशी माहिती लायन्स क्लब अलिबागचे प्रेसिडेंट लायन अभिजित पाटील यांनी दिली.
स्पर्धेच्या व आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देण्यासाठी रायगड जिल्ह्यातील होतकरू पदवीधर युवकांना योग्य मार्गदर्शन मिळावे तसेच गुणवत्ता असूनही जागतिक
स्पर्धेत आपला युवक मागे पडू नये या उदात्त हेतूने ‘उंची उडान’चे आयोजन करण्यात आल्याचे लायन्स क्लब अलिबागचे प्रेसिडेंट लायन अभिजित पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमात नोकरी-व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या वेगवेगळ्या सॉफ्ट स्किल्सबाबत कॉर्पोरेट क्षेत्रातील अनुभवी व अधिकारी व्यक्ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. यात प्रभावी संभाषण, लक्ष्य निर्धारण, प्रेरणा, आत्मविश्वास, वेळेचे नियोजन, संघभावना, मुलाखत कशी द्यावी यांसारख्या विषयांवर कॉर्पोरेट व पत्रकारिता क्षेत्रातील नामवंत रत्ना वेंकटरमण, कविता मैयानी, तरुण दुग्गल, शालिनी गंजू व मयुरा रामटेके यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांना होईल. कार्यक्रमाचा लाभ घेऊ इच्छिणार्या होतकरू पदवीधर उमेदवारांनी अधिक माहितीसाठी प्रोजेक्ट व्हॉट्सअॅप ग्रुपवर हीींिं://ुर्सिीपलहळ र्ीवररप.श्रळेपीलर्श्रीलरश्रळलरस.लेा जॉईन व्हावे किंवा लीडर लायन चंद्रहार शिंदे (7038844365), लिओ सिमरन गांधी (9209349261) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन लायन्स क्लब अलिबागतर्फे करण्यात आले आहे.