उरण : वार्ताहर
33 मावळ लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आरपीआय महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा चंदू बारणे असून उरण शहरात मंगळवारपासून मतदारांच्या घरोघरी जाऊन पत्रक देऊन कार्यकर्त्यांनी प्रचार सुरु केला आहे. मंगळवारी (दि. 16) पासून स्वामी विवेकांनद चौक, सातरहाटी आदी ठिकाणी मतदारांना पत्रके देऊन प्रचार केला.
बुधवारी (दि.17) गणपती चौकपासून पुढे बाजारपेठ, आनंदनगर, पालवी हॉस्पिटल परिसर, राजपालनाका, देऊळवाडी आदी ठिकाणी उमेदवारांना पत्रके देऊन प्रचार करण्यात आला. या वेळी उरण तालुका भाजप अध्यक्ष रवी भोईर, भाजप उरण शहराध्यक्ष तथा नगरसेवक कौशिक शहा, शिवसेना रायगड जिल्हा उपप्रमुख नरेश रहाळकर, नगरसेवक राजेश ठाकूर, नगरसेवक मेराज शेख, नगरसेवक धनंजय कडवे, नगरसेविका जान्हवी पंडीत, नगरसेविका प्रियंका जगदीश पाटील, उरण शहर शिवसेना शाखाप्रमुख विनोद म्हात्रे, महिला प्रमुख विना तलरेजा, शिवसेना महिला संघटक सुजाता गायकवाड, भाजप युवा शहर अध्यक्ष निलेश पाटील, जसिम गॅस, डॉमनिक कोळी, रोहन भोईर, रश्मी गुरव, महेश वर्तक, उल्हास माजगावकर, अशोक पालकर, राजेश निकम, सुनिता कडू, महेंद्र खाडे आदी कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते.