Breaking News

बारणे यांचा विजय ही आता फक्त औपचारिकता

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा दावा

पनवेल  : प्रतिनिधी

महायुतीच्या श्रीरंग बारणे यांची निवड ही आता फक्त औपचारिकता असल्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकुर यांनी मंगळवारी (दि.16) तळोजा येथील प्रचार सभेत बोलताना जाहीर केले.

पनवेल विधानसभा मतदार संघातील तळोजा येथे महायुतीचे उमेदवार  श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ  रात्री 8 वाजता सभा  आयोजित करण्यात आली होती. यावेळी महायुतीचे उमेदवार  श्रीरंग बारणे, सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, कोकण म्हाडाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील,उपमहापौर विक्रांत पाटील,भाजपचे तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत,जिल्हा प्रवक्ते  वाय. टी. देशमुख, नगरसेवक संतोष भोईर , एकनाथ देशेकर, प्रल्हाद केणी, आर.पी.आय.चे अध्यक्ष नगरसेवक जगदीश गायकवाड , सेनेचे बबन दादा पाटील,रामदास शेवाळे उपस्थित होते.

 यावेळी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी महायुतीच्या श्रीरंग बारणे यांची निवड ही आता फक्त औपचारिकता असल्याचे सांगून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

जगात आपल्या देशाचे नाव मोठे केले. .शांततेसाठी भारत प्रयत्न करीत असल्याचे जगाला पटले आहे. त्यामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय  पातळीवरची सात पारितोषिके मिळाली. आपला देश आदर्श असावा ही मोदींची इच्छा आहे. त्यासाठी प्रत्येकाने आदर्श खासदार निवडून देणे गरजेचे आहे.असे ते म्हणाले.

यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी आपला देश प्रगतीपथावर नेण्यासाठी , त्याचे नाव मोठे करण्यास्थी आणि देशाच्या हितासाठी ही निवडणूक महत्वाची आहे. त्यासाठी नरेंद्र मोदींना साथ देण्यासाठी आपल्याळ निवडून देण्याचे त्यांनी आवाहन केले

रिपाईं अध्यक्ष जगदीश गायकवाड यांनी पनवेल महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेच्या भावोजींनी शेकाप हातमिळवणी करून  घात  केल्याचे सांगत यावेळी त्यांनी मोदींना साथ देण्याचा योग्य निर्णय घेतल्याने त्यांना मत देण्याचे आवाहन केले. यावेळी कोकण म्हाडाचे  अध्यक्ष  बाळासाहेब पाटील यांनी ही शासनाच्या योजनांची माहिती देऊन मोदींना साथ देण्यासाठी बारणेंना मते देण्याचे आवाहन केले.

Check Also

उलवेतील रामशेठ ठाकूर मैदानावर कबड्डीचा थरार!

पनवेल ः रामप्रहर वृत्तसंघभावना, अचूक रणनीती, वेगवान चढाया आणि बचावातील नियंत्रण यांचा रोमांचक संगम उलवे …

Leave a Reply