Breaking News

उलवे नोडमध्ये जल ही जीवन रॅली; परेश ठाकूर यांचा सहभाग

पनवेल : रामप्रहर वृत्त

सेवा पंधरवड्यानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालय सिबीएससी आणि मराठी मिडीयम यांच्या सहकार्‍याने रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पनवेल यांच्या वतीने जल ही जीवन या रॅलीचे उलवे नोड येथे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते तथा विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर यांनी सहभाग घेत जनजागृती केली.

या रॅलीची सुरुवात उलवे नोड 21 सेक्टर येथून करण्यात आली असून बामणडोंगरी सेक्टर 19 येथे सांगता झाली. या रॅली वेळी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, जिल्हा परिषद सरचिटणीस निलेश खारकर, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, विजय घरत, भाजप उलवे नोड उपाध्यक्ष शैलेश भगत, भाजपचे वहाळ पंचायत समिती अध्यक्ष धीरज ओवळेकर, दीपक गोंधळी, अमित नाईक, सीमा कांबळे आदी उपस्थित होते.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून पनवेलमधील कानपोलीत विकासकामे

भाजप नेते अरुणशेठ भगत यांच्या हस्ते शुभारंभ पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघात आमदार प्रशांत …

Leave a Reply