Breaking News

स्वातंत्र्यदिनी खारघरमध्ये रक्तदान शिबिर

खारघर : रामप्रहर वृत्त

खारघर युवाप्रेरणा सामाजिक संस्थेच्या वतीने दरवर्षी देशाच्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत टाटा कॅन्सर हॉस्पिटलमधील कॅन्सर पीडित रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. रविवारी (दि. 15) अकरावे रक्तदान शिबिर खारघरच्या सेक्टर 19मधील रामशेठ ठाकूर शाळेत झाले. शिबिरात 72 रक्तदात्यांनी रक्तदान केले यात तरुणांचा विशेष सहभाग दिसून आला.

या वर्षीच्या शिबिरात माहेश्वरी प्रगती मंडळानेदेखील सहभाग नोंदवला. शिबिराला पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्यासह भाजप खारघर-तळोजा मंडल अध्यक्ष ब्रिजेश पटेल आदींनी उपस्थित राहून रक्तदात्यांचे मनोबल वाढवत शुभेच्छा दिल्या. शिबिराचे आयोजन नगरसेविका नेत्रा किरण पाटील व त्यांच्या सर्व सहकारी यांच्या वतीने करण्यात आले होते.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply