सभापती सुशिला घरत यांच्या स्वखर्चाने नवीन पाइपलाइनचे काम

पनवेल : रामप्रहर वृत्त

पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग ’ड’ सभापती सुशिला जगदीश घरत व सामाजिक कार्यकर्ता जगदिश घरत यांनी नवीन पनवेलमधील पीएल 5।52 बिडींगमध्ये स्वखर्चाने नवीन पाइपलाइनचे काम करून दिले. त्यामुळे तिसर्‍या मजल्यावर पर्यंत पाणी पोहचून रहिवाशांच्या चेहर्‍यावर आनंद निर्माण झाला.

काही दिवसांपासून पीएल 5।52 सेक्टर 17 बिडींगमध्ये पाण्याची समस्या निर्माण झाली होती. ही बाब रहिवाशांनी सभापती सुशिला घरत व समाजसेवक जगदीश घरत यांची भेट घेऊन प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. या वेळी तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले, त्यानुसार दुसर्‍याच दिवशी स्वखर्चाने कामाला सुरुवात करून काम पूर्णत्वास आले.  त्यामुळे रहिवाशांना फार मोठा दिलासा मिळाला. त्याबाबद्दल रहिवाशांनी सभापती सुशीला घरत व जगदीश घरत यांचे आभार मानले.

या वेळी प्रभाग 17 अध्यक्ष विजय म्हात्रे, युवा नेते सचिन पाटील, इंद्रायणी असोशियनच्या अध्यक्ष सुभद्रा भोळी, संदीप ना. पाटील, शरद म्हात्रे, अनंत ठाकूर, विशाल जावळे, अनंत जाधव व महिला वर्ग उपस्थित होता.

Check Also

Midi Bbb Company Profile Bbb

Posts Midi Health Secures $14M Money To take Professional Midlife Care for Women 40+ Each …

Leave a Reply