Breaking News

रायगडात भाजप महायुतीचा खासदार निवडून येईल -प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

अलिबाग ः प्रतिनिधी
भाजपच्या कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून जनतेकडूनदेखील चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात 48 पैकी 45 खासदार भाजप महायुतीचे निवडून येतील. रायगड लोकसभा मतदारसंघातूनदेखील भाजप महायुतीचाच खासदार निवडून येईल, असा विश्वास भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. भाजपतर्फे महाविजय 2024 अंतर्गत अलिबाग येथे बुधवारी (दि. 18) आयोजित करण्यात आलेल्या सभेत ते बोलत होते.

या सभेस भाजप मावळ लोकसभा प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, माजी मंत्री बाळा भेगडे, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, रायगड लोकसभा प्रमुख सतीश धारप, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, वैकुंठ पाटील, दिलीप भोईर, अ‍ॅड. पल्लवी तुळपुळे, सरचिटणीस अ‍ॅड. महेश माहिते, मिलिंद पाटील, अलिबाग तालुकाध्यक्ष उदय काठे, शहराध्यक्ष अ‍ॅड. अंकित बंगेरा, सतीश लेले, सुनील दामले, परशुराम म्हात्रे, हेमंत दांडेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी अलिबाग तालुक्यातील विविध ग्रामपंचायतींच्या सदस्यांसह सुमारे पाच हजार कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष बानकुळे यांनी त्यांचे स्वागत केले.

Check Also

आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक शरद कदम यांचा भाजपमध्ये प्रवेश

पनवेल : रामप्रहर वृत्तआंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक तथा खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शरद कदम …

Leave a Reply