Breaking News

महाडकरांचे प्रश्न सरकारकडे मांडणार

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची ग्वाही

महाड ः प्रतिनिधी

महाडमधील पूरग्रस्तांचे प्रश्न अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे प्राधान्याने मांडणार असल्याची ग्वाही केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सोमवारी (दि. 23) महाडकरांना दिली. जनआशीर्वाद यात्रेदरम्यान ते महाड येथे आले होते. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आदी उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करीत जनआशीर्वाद यात्रा महाडमध्ये दाखल झाली. या वेळी महाडकर नागरिक आणि व्यापारी यांचे प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी समजून घेतले. व्यापार्‍यांना विमा व कर्जाची मदत कशी करता येईल या संदर्भात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा करणार असून तुमचे शिष्टमंडळ घेऊन मी जाईन, असे ते म्हणाले. महाडला पूर का येतो याबाबतचे आपले स्पष्टीकरण मी ऐकले, आपण तज्ज्ञांची मदत घेऊन पाहाणी करून यावर उपायोजना काय करता येईल याचा प्रयत्न करू, असे राणे म्हणाले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

Check Also

यशाचा सोहळा; सामना, बनवाबनवी, माहेरची साडी… आणि ‘देऊळ बंद २’चा

यश हे सर्वाधिक ताकदवान टॉनिक… चित्रपटाच्या जगात यशाचे नाणं कायमच चालणारं. सर्वांनाच हवेहवेसे वाटणारे. जपून …

Leave a Reply