Breaking News

नवी मुंबई महापालिकेने वैद्यकीय तज्ज्ञ नेमावेत

भाजपच्या संजय पवार यांची आयुक्तांकडे मागणी

पनवेल : वार्ताहर

नवी मुंबई महापालिकेने नोडल ऑफिसर किंवा पालिकेच्या नियुक्तीने वैद्यकिय तज्ज्ञ नेमण्याची मागणी भारतीय जनता पक्ष कामगार सेलचे प्रदेश सचिव संजय पवार यांच्याकडून आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे करण्यात आली आहे.     

नवी मुंबई महापालिकेने वाढत जाणार्‍या कोविड रुग्ण संख्येसाठी नवी मुंबईमधील काही छोट्या हॉस्पिटलमध्ये कोविड सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आल्या होत्या. असे हॉस्पिटल नवी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी कार्यरत आहेत व अत्यावश्यक वेळेमध्ये हे हॉस्पिटल जनतेच्या उपयोगी पडत आहेत. पालिकेने आपत्कालीन स्थितीत नव्याने परवानगी दिलेल्या काही रुग्णालयात उपचाराच्या दर्जाबाबत माहिती पालिकेकडे असावी कारण अनेक लहान रुग्णालयात मृत्यू घडत असल्याचे आढळून येत आहे. त्या करिता पालिकेने त्या ठिकाणी नोडल ऑफिसर नेमावेत किंवा त्या ठिकाणी पालिकेच्या नियुक्तीने वैद्यकिय तज्ज्ञची नेमणूक करण्यात यावी.

नवी मुंबईमध्ये दिवसेंदिवस नवीन रुग्णसंख्यची घट होत आहे. त्याप्रमाणे होणार्‍या मृत्यूची कारणेदेखील जनतेच्या समोर येतील. अशा तर्‍हेची मागणी संजय पवार यांच्याकडून नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे करण्यात आली आहे.

Check Also

पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर

खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …

Leave a Reply