Breaking News

मावळमध्ये पुरुष मतदार ठरणार लाखमोलाचे

पनवेल : प्रतिनिधी

मावळ 33 लोकसभा मतदारसंघात 29 एप्रिल रोजी होणार्‍या निवडणुकीत 22 लाख 27 हजार 133 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या मतदारसंघात पुरुष  मतदारांची संख्या महिलांपेक्षा लाखाने जास्त आहे. त्यामुळे या मतदारसंघाचा खासदार निवडण्यात पुरुषांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघात सगळ्यात जास्त मतदार, तर कर्जतमध्ये सगळ्यात कमी मतदार आहेत. मावळमध्ये  600 सर्व्हिस मतदार, तर 32 तृतीयपंथी मतदार आहेत, अशी माहिती मावळ मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कविता द्विवेदी यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी मावळ 33 मतदारसंघात 29 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असून अद्यावत मतदार यादीही प्रसिध्द करण्यात आली आहे. या यादीप्रमाणे

मावळमध्ये  22 लाख 27 हजार 133 मतदार असून त्यापैकी 11 लाख 65 हजार 788 पुरुष आणि 10 लाख 61 हजार 313 महिला मतदार आहेत. मावळ मतदारसंघात कोकणातील रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण आणि कर्जत या तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. या तीन विधानसभा मतदारसंघांत 10 लाख 77 हजार 37 मतदार आहेत. पुण्यातील मावळ, चिंचवड व पिंपरी या तीन विधानसभा मतदारसंघांत 11 लाख 50 हजार 696 मतदार आहेत.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply