Breaking News

लहान मुलांना ऑक्टोबरपासून लस

12 ते 17 वयोगटाला तीन डोस घ्यावे लागणार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
केंद्र सरकारने 12 ते 17  वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी तयारी सुरू केली आहे. येत्या ऑक्टोबरपासून झायडस कॅडीलाची झायकोव्ह-डी ही लस देण्यात येणार आहे. मुलांना या लसीचे तीन डोस द्यावे लागतील. एनटीएजीआय प्रमुख एन. के. अरोरा यांनी या संदर्भात माहिती दिली आहे.
गंभीर आजार असलेल्या मुलांची यादी तयार करून त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे, असेही अरोरा यांनी सांगितले.देशात कोरोनाविरोधात लढ्यात सहा लसी झाल्या आहेत. झायकोव्ह-डी ही लस 66.6 टक्के इतकी प्रभावी ठरली आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर अभियंता प्रकोष्ठ प्रदेश प्रभारीपदी

भाजपच्या संघटनात्मक विस्तारात नव्या जबाबदारीची भर पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस …

Leave a Reply