नवी दिल्ली : संसद टीव्ही या चॅनेलचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (दि. 15 सप्टेंबर) संसद भवनात आयोजित कार्यक्रमात होणार आहे. या लोकार्पण सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यकंय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित राहणार आहेत. संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज दाखवणार्या लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्हा दोन्ही वाहिन्यांचे सरकारने विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही वाहिन्यांचं विलीनीकरण करून संसद टीव्ही अशी एकच वाहिनी असणार आहे. सेवा निवृत्त सनदी अधिकारी रवी कपूर यांची संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
Check Also
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे -आमदार प्रशांत ठाकूर
खारघरमध्ये पर्यावरणपूरक शवदाहिनीचे लोकार्पण, प्राणी अंत्यसंस्कार केंद्राचे भूमिपूजन खारघर ः रामप्रहर वृत्तपर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आपण …
RamPrahar – The Panvel Daily Paper